अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रणाईचे येथे दोन दिवसापूर्वीच आग लागून शेतकऱ्यांचे शेती उपयोगी साहित्य चारा जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतांनाच आज पुन्हा भिलाली येथे खळवाडीला अचानक आग लागून चारा, शेती उपयुक्त साहित्य जळून खाक होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यात शेतकरी कैलास पाटील यांचा चारा, पत्राचा शेड व कापूस, असे मिळून पंधरा लाखाचे नुकसान तर दगा पाटील यांचे चारा, पत्र्याचे शेड, असे मिळून चार लाख रुपयाचे तसेच नगराज पाटील यांचे दोन ते तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे कळते.
अमळनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी भिलाली गावाला नुकतीच भेट देऊन आगीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांची सांत्वन केले. आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही. यावेळी भिलाली येथे लागलेल्या आग विझवण्यासाठी गावकऱ्यांनी मोठ्या हिमतीने प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यासाठी अमळनेरचे दोन शिंदखेडा येथिल एक बंब व एकलहरे येथील टँकरच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले आहे.
आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न पंचायत समिती सदस्य भिकेश पाटील,सरपंच अविनाश पाटील,भिलाली येथील दिनेश बापू माळी, प्राध्यापक पि.के. पाटील,भाऊसाहेब गिरासे यांनी आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. घटनास्थळी मारवडचे व परिसरातील शहापूर, एकलहरे एकतास,बेटावद, येथील ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. घरातील माठ, व गावहाळ मधील पाणी नागरिक आणून आगीवर टाकत होते. यावेळी तरूणांनी मोठ्या प्रमाणावर हिम्मत दाखवून खळ्यातील गुरे ढोरे सोडून जीव वाचविण्यासाठी प्रयत्न केले.