एमआयडीसीतील कंपनीच्या गोडावूनला आग

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |जळगाव शहरातील एमआयडीसीतील एफ सेक्टरमधील अमित रोलींग मिल कंपनीच्या गोडावून मधील वेस्टेज असलेल्या पुठ्ठ्याच्या टाक्यांना अचानक आग लागून नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. या घटेनची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचे अग्निशमनचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. याबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील एफ-२८ मधील अमित रोलींग मिल कंपनी आहे. या कंपनीच्या गोडावूनमध्ये पुठ्ठ्याच्या रिकाम्या लहान टाक्या ठेवण्यात आलेल्या आहे. शिवाय काही वेस्टेज असलेल्या केमीकलच्या टाक्या देखील याच ठिकाणी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, शुक्रवारी ३१ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता गोडावूनमधील पुठ्ठ्याच्या टाक्यांना अचानक आग लागली. ही आग कश्यामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. या घटनेची माहिती महापलिकेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आली. त्यानुसार दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यात आली आहे.

Protected Content