अल्पवयीन मुलीस आत्महत्येत प्रवृत्त केले; भुसावळात एकाविरूध्द गुन्हा

भुसावळ प्रतिनिधी । शहरातल्या महात्मा फुले नगरमधील एका अल्पवयीन मुलीस फोनवरून बोलण्याच्या कारणावरून पाणउतारा केल्याने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी एका विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील महात्मा फुले नगरातील रहिवाशी शेख शरीफ शेख शब्बीर हे मोलमजुरी करून आपल्या परिवारासोबत राहतात. दिनांक १६ जुलै २०२० ते दवाखान्यातून घरी आलेे असता त्यांच्या १७ वर्षे वयाच्या मुलीने गळफास घेतल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. याबाबत माहिती घेतली असता संबंधीत मुलगी त्याच दिवशी सायंकाळी ५:३० ते ६:०० वाजेच्या दरम्यान पंकज अरुण कुटे या इसमासोबत फोन वर बोलत होते. ही गोष्ट अरुण मधुकर कुटे यास माहिती पडली. यानंतर तो मुलीच्या घराजवळ गेला व शिवीगाळ करून चपटांनी मारहाण करून धमकी दिली. तुझ्या आई-वडिलांना येऊ दे त्यांना सांगतो.यामुळे मुलगी घाबरली व घरामध्ये आली.अरुण मधुकर कुटेने सर्वांसमोर मारहाण करून पाणउतारा केल्याने बदनामी झाल्यामुळे मुलीने घराच्या वरच्या खोलीत जाऊन साडीला लटकून गळफास घेतला.

दरम्यान, आपल्या मुलीच्या आत्महत्येस अरुण मधुकर कुटे जबाबदार असल्याची फिर्याद शेख शरीफ शेख शब्बीर यांनी दिली. या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशनला कलम ३०६,३२३,५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अरुण मधुकर कुटेस अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे हे करीत आहेत.

Protected Content