यावल प्रतिनिधी । येथील हडकाई नदिच्या काठावर गोवंशाची हत्या करून अवशेष तेथेच टाकल्याने दोन जणांविरूध्द येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, येथील हडकाई नदि पात्राच्या काठावर विना परवानगीने कुडाचा आडोसा करून तेथे संशयीत आरोपी शेख मोहसीन श.खालीद (रा. बाबानगर) व अय्याज महेमुद बागवान यांनी गोवंश हत्याबंदी कायदा लागु असतांना कोणत्यातरी गुरांची हत्या करून त्याच जागेवर त्यांची तोंडे व अवयव टाकून नदिपात्रात मांस व अवयव साफ केले. तसेच विना परवानगीने रीक्षा क्र. एम. एच. १९-एम-७६५१ मधून वाहतुक करतांना आढळून आलेत अशा आशयाची पियुष संतोष भोईटे यांनी फिर्याद दिली. यावरून दोघां संशयीताच्या विरूध्द भादवी कलम ४२९, ३४ सह महा. प्राणी सरंक्षण अधिनियम २०१५ चे कलम ५ (क)९ (अ) सह महा. पोलीस कायदा कलम सुधारणा १०८/११७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचे वृत्त कळताच विभागीय पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पिंगळे, पो. नि. रविकांत सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून निरीक्षण केले. फौजदार जितेंद्र खैरनार, हे.कॉ. संजय तायडे, गणेश मनुरे पुढील तपास करीत आहेत.