Home क्राईम डॉ. राजेंद्र भारूड यांच्या विरोधात गुन्हा दाखल

डॉ. राजेंद्र भारूड यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0
339

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीत आदिवासी कोळी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्या प्रकरणी आदिवासी विकास व संशोधन प्रशिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्या विरोधात जळगावत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत दिनांक 6/08/2024 रोजी आदिवासी टोकरे,मल्हार,महादेव कोळी जमात बांधवाची बैठक सह्यादी अतिथीगृहात झाली होती. त्या बैठकीत आदिवासी विकास व संशोधन प्रशिक्षण संस्थेचे संचालक डॉ राजेंद्र भारूड यांनी आदिवासी कोळी जमाती बाबत अपमानजनक व्यक्तव्य केले होते. त्यामुळे सभेत गोंधळ व आदिवासी कोळी जमातीचा उद्रेक झाला होता व मुख्यमंत्री महोदयांना बैठक गुंडाळावी लागली होती. स्वतः मुख्यमंत्री व उपस्थित मंत्री व आमदारांनी भारूड यांच्या बैठकीतील वागणुकी बद्दल नाराजी व्यक्त केली होती.

डॉ भारूड यांच्या विरोधात जळगावातून ऑनलाईन पोलीस तक्रार पंकज रायसिंग यांनी दिनांक 9/08/2024 रोजी दाखल केली आहे. व प्रवर्तन बहूदेशिय् संस्थेचे अध्यक्ष मदन शिरसाठ यांनी पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून तक्रार दाखल केलेली आहे. ऑफ लाईन तक्रार सादर करतांना मंगलाताई सोनवणे,मदन शिरसाठ, तुषार सैंदाणे,पंकज सोनवणे, भगवान सोनवणे, दिप्तेश सोनवणे, विशाल सपकाळे, ऋषिकेश सोनवणे,संदीप कोळी,बाळासाहेब सैंदाणे,पंकज रायसिंग,दीपक तायडे,गुलाबराव बाविस्कर,लीलाधर कोळी,डीगंबर सोनवणे, निखिल सपकाळे,जयेश कोळी, सुभाष सोनवणे आदी उपस्थित होते. भारूड यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याने आदिवासी विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound