पारोळा येथे निवृत्त शिक्षक भावसार यांच्यातर्फे आर्थिक मदत

WhatsApp Image 2020 01 12 at 2.29.54 PM

पारोळा, प्रतिनिधी | शहरातील राज्य आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद भावसार यांनी सामाजिक बांधिलकीजपत वृतपत्र विक्रत्याच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शहरातील मागील ५० वर्षापासून पायी वृत्तपत्र वाटप करणाऱ्या मुकेश गुजराथी यांचे १५ दिवसांपूर्वी अल्पश्या आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती दयनीय असून एकुलत्या एक मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. त्यांच्या जाण्याने गुजराथी कुटुंबाचा कर्ता व्यक्ती गेल्याने त्यांच्या वारसांना मदत होणे कामी  सदानंद भावसार यांनी आपल्या सेवा निवृत्ती रकमेतून ५ हजार रुपयांचे अर्थ सहाय्य दिले आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकांना मदत दिली असून राज्य व राष्ट्रीय आपप्ती असो की मुख्यमंत्री व पंतप्रधान सहाय्यता निधीत ते मागील १५ वर्षांपासून मदत देत आहेत . स्व.मुकेश गुजराथी यांच्या कुटुंबास दर्पण पत्रकार संघ व गुजराथी मित्र मंडळ यांनीही अर्थ सहाय्य यापूर्वी केले आहे. यावेळी पत्रकार अभय पाटील, बापूसाहेब नावरकर, किशोर गुजराथी, विजय नावरकर, भैय्या बैसणे, शिरीष काटे, मुलगा दीपक गुजराथी उपस्थित होते.

Protected Content