चाळीसगावात ‘वित्तीय साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम’ संपन्न (व्हिडीओ)

चाळीसगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बँकिंग ग्रामीण विकास संस्था, लखनऊ व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथील हॉटेल अन्नपूर्णा रेसिडेन्सी येथे वित्तीय साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

दिनांक २ ते ४ मार्च 2022 या कालावधीत चाळीसगाव येथे ‘वित्तीय साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश नाबार्डचे जीएम श्रीकांत झांबरे व सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या समारोपासाठी खासदार उमेशदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती वित्तीय साक्षरता च्या माध्यमातून ग्राम विकास साध्य करण्यासाठी सरपंचांनी प्रयत्न करावे असे आव्हान अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री अरुण प्रकाश यांनी केले शासनाच्या विविध योजना वित्तीय साक्षरता सरपंचांची भूमिका व ध्येयधोरणे याबाबत श्रीकांत झांबरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणादरम्यान अभ्यास दौऱ्याचे आयोजन करा. देवळी येथे भूमी वीर फार्मर प्रोड्यूसर कंपनीला भेट बँक ऑफ बडोदाच्या शाखेला भेट व बँकिंग प्रणालीची माहिती करून घेणे, पैठण युनिटला भेट अशा स्वरूपाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेद्वारे गावाचा विकास करण्याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी खासदार उमेशदादा पाटील यांनी, “वित्तीय साक्षरता ग्रामीण विकासाचे कणा असून विद्युत वित्तीय साक्षरताद्वारेच ग्रामीण विकास होऊ शकतो. सर्वांना बँकिंग प्रणालीमध्ये अनेक आवश्यक असून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन खासदार उमेशदादा पाटील यांनी केले. साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ३७ ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंचायत समितीचे कर्मचारी अधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
व्हिडीओ लिंक

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/555985775909361

Protected Content