रावेर प्रतिनिधी । सावखेडा (ता.रावेर) येथील ४१ गरीब विद्यार्थीनीची रावेर पंचायत समिती समाज कल्याण विभागामार्फत ब्यूटी पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेने आर्थिक फसवणुक केल्याची धक्कादायक घटना घडली असून आर्थिक फसवूणक झालेल्या सर्व मुलींनी रावेर पंचायत समितीकडे या बाबत तक्रार केली आहे.
रावेर पंचायत समिती समाज कल्याण विभागा मार्फत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास मुलींना स्वता:च्या पायावर उभे राहण्यासाठी विनामूल्य ब्यूटीपार्लरचे प्रशिक्षण तसेच ब्यूटीपार्लरचे साहित्य पुरवले जाते.परंतु प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली रावेरच्या वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेने सर्व मुलींची आर्थिक फसवणुक करून अटी-शर्तीचा भंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.संस्थेने प्रत्येक गरीब मुलीं कडून अतिरीक्त ४०० रुपये प्रमाणे फि व फार्म भरण्याचे १० रुपये अशी एकूण ४१० रुपये प्रमाणे ४१ मुलींकडून १६ हजार ८१० रूपयांची वरकमाई केली आहे. तसेच प्रशिक्षणपोटी देलेले ब्युटी पार्लरचे साहित्य देखिल मुदत संपलेल दिल्याने अनेक मुलींचे चेहरे खराब झाल्याची तक्रार पंचायत समितीत तक्रार घेऊन आलेल्या मुलींनी केली आहेत.
वात्साल्य ब्युटी पार्लरचा प्रताप
तालुक्यातील गरीब आर्थीक दृष्ट्या मागास विद्यार्थीनीना स्वता:च्या पायावर उभे राहावे म्हणुन रावेर पंचायत समिती समाज कल्याण विभाग विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेची नेमणुक केली होती.यासाठी प्रत्येक विद्यार्थीनीमागे संस्थेला पंचायत समिती ३ हजार ९९९ रुपये पेड़ करत होती अश्या एकूण ४१ मुलींना प्रशिक्षण दिल्या बद्दल रावेर पंचायत समितीने १ लाख ६३ हजार ९५९ रुपये रावेर पंचायत समितीने वात्साल ब्युटी पार्लर संस्थेला दिले आहे. संस्थेने मुलींकडून देखिल १६ हजार ८१० रूपयांची वरकमाई नियमांची पायमल्ली करून जमा केली आहे.
संस्थेवर कारवाई व्हावी
दरम्यान वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेत प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थीनीनी रावेर पंचायत समितीत गाठुन संस्थेवर कारवाई करण्याची मागणी तक्रारीद्वारे केली आहे. दरम्यान आम्ही खुप दिवसां पासुन फिरतोय परंतु आमच्या तक्रारीकडे कोणीही लक्ष देत नसल्याची खंत प्रशिक्षणार्थी विद्यार्थीनीनी केल्या आहे.वात्साल्य ब्युटी पार्लर संस्थेच्या विरुध्दात दिलेल्या तक्रारीवर मोहिनी पाटील यांच्यासह सुमारे ४१ गरीब विद्यार्थीनीच्या सह्या आहेत