रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यात अतीवृष्टी झाल्याने नागझिरी नदीला आलेल्या पुरामध्ये मयत झालेल्या इकबाल कुरेशी यांच्या कुटुंबाला महसूल प्रशासनातर्फे ४ लाख रुपयाची आर्थिक मदत तहसीलदार बंडू कापसे यांच्याहस्ते वारसांना देण्यात आले.
रावेर तालुक्यात ६ जुलै रोजी अतीवृष्टी पाऊस झाल्यामुळे नागझिरी नदीसह तालुक्यातील इतर नद्यांना मोठा पुर आला होता. यात पुरात तीन जण वाहून गेल्याने दुदैवी मृत्यू झाला होता. याबाबत तहसिलदार बंडू कापसे यांनी नुकसानग्रस्त भागाला मदत मिळावी म्हणून शासनाकडे पाठपुरावा करत नैसर्गिक आपत्तीतून मयत इकबाल कुरेशी यांच्या पत्नी राबिया इकबाल कुरेशी यांना ४ लाखाचा धनादेश देऊन तात्काळ मदत केली. तसेच इतर मयत बाबुराव रायसिंग बारेला हा मध्यप्रदेश येथील रहीवासी असल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवुन देण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. तर तिसरे मयत सुधीर गोपाळ पाटील यांना देखिल लवरकच धनादेश देण्यात येणार आहे. यावेळी नायब तहसीलदार सजंय तायडे राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, माजी नगरसेवक आसिफ शेख, तलाठी स्वप्निल यावेळी उपस्थित होते.