
जामनेर (प्रतिनिधी) येथील नगर परिषदेच्या वतीने आपल्या स्थानिक कर वसूलीतील एकूण ३ टक्के रक्कम शहरातील दिव्यांग लाभार्थ्यांना आर्थिक मदत म्हणून नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या हातून धनादेश स्वरूपात नुकतीच देण्यात आली.
शासन निर्णयाचे स्वागत करीत त्यानुसार नगर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय सर्वानूमतें मंजूर करण्यात आला होता. एवढेच नव्हे तर, तात्काळ त्याची अमलंबजावणी करीत २० लाभार्थ्यांना ५० टक्के पर्यंत तीन हजार रूपये, ७५ टक्के पर्यंत पाच हजार व त्या पुढील दिव्यागांसाठी ८ हजार अशा एकूण १ लाख २० हजार रुपयाचे धनादेश पहिल्या टप्प्यात लाभार्थ्यांना देण्यात आले.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहूल पाटील,अकाउंटंट शेख,सि.एन.खर्चे,उपनगराध्यक्ष अनिस शेख, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,महेंद्र बाविस्कर,जितेंद्र पाटील,बाबुराव हिवराळे, आतिष झाल्टे, आदिसह पदाधिकारी कार्यकर्ते व लाभार्थी धनादेश वाटप वेळी उपस्थित होते. शहरातील अजून दिव्यागं लाभार्थी यांनी मदत मिळविण्या कामी आपले अर्ज आवश्यक त्या प्रमाणपत्रासह भरून नगर परिषदेकडे सादर करण्याचे आवाहन, नगर परिषद प्रशासनाने केले आहे.