अखेर भाजप नेते आमदार नितेश राणे यांना जामीन मंजूर

सिंधुदुर्ग – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । जिल्हा बँक निवडणूकीत संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांना अखेर सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

काय आहे हे प्रकरण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत १८ डिसेंबर २०२१ रोजी कणकवलीत  शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या करण्यात आला होता. यात  भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भोवर्‍यात आडकले आहेत.  परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले होते.

याप्रकरणी नितेश रोणे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तब्येतीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात हलवले गेले. आता सिंधुदुर्ग न्यायालयाने त्यांना ३० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

 

Protected Content