जळगाव प्रतिनिधी । भाड्याने घेवून नेलेली कार तीन होवूनही परत न केल्याच्या कारणावरून तस्लिम शेख रहिम शेख रा. पिरजादे वाडा मेहरूण यांच्या विरोधता गुरूवार २ सप्टेबर रोजी सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात इंद्रप्रस्थ नगरातील रहिवासी परशुराम उर्फ पंकज परमेश्वर पाटील (वय ३५) यांच्याकडे ४ लाख ५० हजार रुपये किमतीची (एमएच १९ बीबी ९४००) क्रमांकाची कार आहे. त्याच्या ओळखीचा तस्लिम शेख रहीम शेख रा. पिरजादे वाडा, मेहरुण याने पंकजा विश्वास संपादन करुन भाडे करारावर त्याची कार ८ मे रोजी घेवून गेला होता. मात्र अद्यापर्यंत त्याने कार परत केलेली नाही. याप्रकरणी परशूराम पाटील यांनी तस्लीम शेख रहिम शेख याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुरुवारी २ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महेंद्रसिंग पाटील हे करीत आहे.