केळी उत्पादकाची फसवणूक करणार्‍या व्यापार्‍यांविरूध्द गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । येथील एका केळी उत्पादक शेतकर्‍याची व्यापार्‍याकडुन फसवणूक झाली असून त्याने दिलेले धनादेश न वटल्याने यावल पोलीसांनी संबंधीत व्यापार्‍याच्या विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 दरम्यान या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की यावल येथील महाजन गल्लीत राहणारे केळी उत्पादक शेतकरी किशोर देवराम राणे (वय ४५ ) यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , लिलाधर प्रल्हाद पाटील ( रा. सिंधीपुरा गेट जवळ बहादरपुर तालुका जिल्हा बर्‍हाणपूर) यांनी २ / १२ / २०१८ ते ७ / १२ / २०१८या कालावधीत फिर्यादी किशोर देवराम राणे यांच्या यावल शिवारातील शेत गट क्रमांक१००६व१९२२या मधील १८१ क्विंटल ५५ किलो वजनाची केळी किमत२ लाख१५ हजार रुपयांची खरेदी करून त्याच्या मोबदल्यात धनादेश दिले होते. 

मात्र हे धनादेश बँकेत न वटल्याने फिर्यादीने लिलाधर पाटील यास केळी मालाचे पैसे मागीतले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत त्यांना धमकावले. या प्रकारानंतर केळी उत्पादक शेतकरी किशोर राणे यांनी आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर आज दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी यावल पोलीस स्टेशनमध्ये लिलाधर पाटील यांच्याविरुद्ध फ़िर्याद दाखल केली. यानुसार गु .र .न .१५८ भादवी कलम४२०प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नितिन चव्हाण हे करीत आहेत.

Protected Content