चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; सावदा येथे शिवसेनेची मागणी

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । रोहिणी खडसे-खेवलकर यांनी शिवसेनेचे आमदार चंद्रकात पाटील यांना मारण्याची भाषा केल्याच्या निषेधार्थ सावदा येथे शिवसेनेच्या वतीने सावदा पोलीसांना निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना मारण्याची भाषा केली आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांना मारण्याची चिथावणीखोर भाषा वापरलेली आहे. यामुळे तमाम जनतेचे लोप्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तीच्या जीवितावर खडसे कुटुंबीय उठलेले दिसून येत असून अतिशय वैफल्यग्रस्त ग्रस्त झालेल्या खडसे खेवलकर यांचेवर चिथावणीखोर वक्तव्य केलेप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल.

 

या निवेदनावर शिवसेना शहराध्यक्ष भरत नेहते, सुरज परदेशी, माजी नगरसेवक धनंजय चौधरी, विश्वनाथ कोळी, मनीष भंगाळे, गणेश माळी याच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

Protected Content