यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मागील काही वर्षापासून वादग्रस्त विषयांना घेऊन चर्चेचा विषय बनलेली श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत यावलच्या माजी चेअरमनवर चौकशी अहवाल प्राप्त झाल्या अनुसार फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल यांच्याकडे नितीन श्रावण सोनार यांनी दिलेल्या तक्रार निवेदनाव्दारे केली असून यावर सहकारी संस्था कार्यालय काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून आहे.
या संस्थेचे कलम ८८ आणि चौकशी करून चौकशी अधिकारी यांनी १२ डिसेंबर २२ रोजी अहवाल सादर केलेला होता. सदर अहवालामध्ये तत्कालीन चेअरमन यांनी फौजदारी गुन्हा केल्याची स्पष्ट निदर्शनास आलेले आहे आठ दहा वर्षापासून संचालकाच्या नावाने बनावट ठराव तयार करून खोटे प्रोसेडींग करून सहकार विभागाची सभासदांची ठेवीदारांची फसवणूक करीत असल्याचे सिद्ध झालेले आहे.
शासकीय रकमांचा अपहार केल्याची ही सिद्ध झालेली आहे.तत्कालीन चेअरमन यांची गंभीर गुन्हे उघडकीस येऊन एक वर्षाच्या कालावधी होऊन त्यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केलेले नाही हे संशय निर्माण करणारी बाब असून तत्कालीन चौकशी अधिकारी एम. एम. पाटील यांना आपल्या कार्यालयाने संस्थेची कलम ८८ अन्वये चौकशी करण्याकरता प्राधिकृत केले होते, २०१० मध्ये माझी संचालक मंडळावर आपल्या नेमणूक आदेशानुसार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. अद्याप त्याची केस न्यायालयात सुरू आहे.तत्कालीन चेअरमन यांचे गंभीर गुणी उघडकीस येऊनही आजपर्यंत गुन्हे दाखल का केले नाही.
कार्यालयीन कामगार संशयास्पद असल्याचे दिसून येत असून आठ दिवसात प्राप्त अहवालानुसार गुन्हे दाखल करावेत दाखल करण्याचे आदेश पारित करावी असे न झाल्यास या कार्यालयावरच गुन्हे दाखल करण्यासाठी वरिष्ठांकडून परवानगी घेऊन भादवि कलम २१७ अन्वये गुन्हे दाखल करावे लागतील असे निवेदन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यावल यांना नितीन सोनार यांनी २ जानेवारी २०२४ रोजी दिले आहे.