यावल प्रतिनिधी । येथील वादग्रस्त शिवशक्ती बचत गटाने फसवणूक करून शिवभोजन केंद्राचा ठेका मिळवल्याचा आरोप करत या बचत गटाच्या सचिवावर गुन्हा नोंदविण्यात यावी अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे.
येथील आधीच वादाच्या भोवर्यात सापडेल्या यावल येथील शिव भोजन थाली केन्द्राचा ठेका मिळवण्यासाठी शिवशक्ती बचत गटाने कशा प्रकारे शासनाची बोगस व बनावट कागदपत्राद्वारे फसगत करून थाली केन्द्राचा ठेका मिळवला आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे सह शिवसेनेच्या यावल शहर संघटक व महीला सामाजिक कार्यकर्त्या सपना घाडगे यांनी तहसीलदार यांच्याकडे सादर केले असून संबंधीत महीले विरूद्ध शासनाने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.
या संदर्भात आज सपना घाडगे यांनी यावलचे तहसीलदार महेश पवार यांची भेट घेवुन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल येथील राहणार सुनिता भावसार या महीलेने यावल येथील शिव भोजन थाली केन्द्राचा ठेका ज्या शिव शिक्ती महीला बचत गटाच्या नांवाने मिळवला आहे. या महिलेने स्थापन केलेल्या बचत गट आपल्या पतीचे सौ. सुनिता अनिल भावसार असे लावले असुन सदर महीलेचे दुसरे नांव तिचे वडील सुनिता मुरलीधर भावसार असे ही आहे. या महीलेने बचत गटाच्या माध्यमातुन यावल मधील गोरगरिब जनतेचा विश्वासघात करून दोन नांवांचा वापर करून शासनाची देखील फसवणुक केली आह.
सन् २०१५ साली स्थापन केलेल्या शिवशक्ती महीला बचत गटाच्या माध्यमातुन शालेय पोषण आहाराचा कंत्राट मिळवुन पोषण आहारात भेसळ करून खोटे बिले सादर केली होती. शिव शक्ती महीला बचत गटाच्या सचिव पदावर कार्यरत असलेल्या सुनिता भावसार या महीलेने महाराष्ट्र राज्य शासनाच्या परिवहन महामंडळात सुनिता मुरलीधर भावसार असे वडीलांचे नांवने कायमस्वरूपी नोकरी मिळवली असतांना तिला थाली केन्द्राचा ठेका मिळाला कसा ? त्यांनी स्थापन केलेल्या बचत गटात एकाच कुटुंबातील दोन दोन महीलांचा या गटात समावेश केला असुन त्या देखील श्रीमंत कुटुंबातील असल्याचे दिसुन आले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर महिलेने बचत गट हे स्वत:च्या आर्थीक फायद्यासाठी स्थापन केले असुन , विविध शासकीय कामाकरीता त्याचबरोबर ठराव आणी इतर कामासाठी प्रसंगी सुनिता भावसार ही महीलांचा बनावट स्वाक्षरी करून शासनाची फसवणुक करीत असल्याचे दिसुन आले आहे . याशिवाय शासकीय नोकरीवर असतांना पतीचे नांव लावुन दारिद्रय रेषेखालील बीपीएल शिधापत्रीका देखील मिळवली आहे. सदरच्या शासनाच्या शिव भोजन थाली केन्द्र ची मान्यता मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा आधार घेवुन शासनाची फसवणुक करणार्या शिवशक्ती महीला बचत गटाच्या सचिव सुनिता भावसार यांच्यावर शासनाची फसवणुक केल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी तहसीलदार महेश पवार यांच्याकडे दिलेल्या तक्रार निवेदनाद्वारे केली आहे.