सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राहुल सोलापुरकर या इसमाने केलेल्या अवमानकारक वक्तव्याविरोधात आज सावदा पोलीस स्टेशनला निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे संबंधित इसमाविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शिवप्रेमींच्या भावना दुखावणारे आणि समाजात तेढ निर्माण करणारे असे वक्तव्य महाराष्ट्रातील काही व्यक्तींनी वारंवार केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे निवेदनकर्त्यांनी स्पष्ट केले.
निवेदनावर राजू सोनवणे, रविंद्र चौधरी, अनिल पाटील, मनोज पाटील, रमेश पाटील, जगदीश सोनवणे, प्रल्हाद गाणे, राजत महाजन, दीपक महाजन आदींच्या स्वाक्षऱ्या असून, पोलीस प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.