रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर शहर आणि ग्रामीण भागात घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची कमी पैशात घर बांधून देण्याचे आमिष दाखवून बांधकाम ठेकेदार व मिस्तरी त्यांना लुबाडत आहे. अशा ठेकेदार आणि मिस्तरींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेने संदिपसिंह राजपुत यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे केली आहे.
मनसेच्या प्रसिद्धीपत्राचा आशय असा की, प्रधानमंत्री घरकुल योजनेतर्गत रावेर नगर पालिका आणि ग्रामिण भागात पंचायत समिती माध्यमातून शेकडो लाभार्थीना घरकुलचा लाभ मिळाला आहे. मात्र, कमी पैशात घर बांधुन देतो असे गोडगोड बोलुन महिला लाभार्थ्यांची फसवणूक करण्यात येत आहे. यात खोलीसाठी आगाऊ पैसे घेऊन घराचे कामे न करता लाभार्थीना फिरवा फिरवीचे कामे हे बांधकाम ठेकेदार आणि मिस्तरी करत आहेत. अशा चोर भामट्या मिस्तरी आणि ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे.तालुक्याभरात अनेक गोरगरीब कडुन पैसे घेऊन विशेषतः विधवा महिला आणि अशिक्षीत लाभार्थीची कामे न करता केलेली पुंजी घेऊन महिना महिनाभर फरार होत आहे अशा चोर भामटय़ांचा पोलिस व तहसिल प्रशासने बंदोबस्तात करा आशी मागणी लाभार्थीकडुन होत आहे.