पुणे, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपचे विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभेची निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही तर जिंकण्यासाठीच लढवली असून, भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराच्या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीसांचे असल्याचे भाजपच्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात मिळाले आहे. आमचे दोन उमेदवार निवडून येणार होतेच. भाजपच्या तिसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी आमच्याकडे पुरेसे संख्याबळ असून आमचा तिसरा उमेदवारही निवडून येणार हे पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो. त्यानुसार राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे तीन उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला चौथा उमेदवार निवडून आणता आलेला नाही. या निवडणुकीदरम्यान अकेला देवेंद्र क्या करेगा, असे म्हणणाऱ्यांना दणदणीत उत्तर मिळाल्याले असून भाजपा कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचे कार्य देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले असल्याचे भाजपच्या चित्रा वाघ यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
राज्यसभेची निवडणुक भाजपाने यशस्वी खेळी करत जिंकली असून या विजयाचे श्रेय सर्वच भाजपा नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. भाजपाच्या १०६ मतांशिवाय महाविकास आघाडीसोबत असलेल्या काही अपक्ष आमदारांची अतिरिक्त १७ मते मिळवण्यात भाजपाला यश आले असल्याचे प्रत्युत्तर या विजयानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी विरोधकांना दिले आहे.