सुभाषवाडी येथे बैलगाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी

 

जळगाव प्रतिनिधी । बैलगाडीचा धक्का लागल्याच्या कारणावरून तालुक्यातील सुभाष वाडी येथे दोन गटात हाणामारी झाल्याची मंगळवारी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी परस्परविरूध्द १२ जणांवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पहिल्या गटातील शेतकरी पुंडलीक श्रावण राठोड (वय-३२) रा. सुभाषवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  शेतीच्या कामासाठी त्यांच्याकडे बैलजोडी आहे. ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास बैलगाडीने ते गावातून जात असतांना सुभाष उत्तर चव्हाण याच्या घरासमोरील अंगणात वाळूने भरलेल्या गोणीला बैलगाडीचा धक्का लागला. या कारणावरून पुंडलीक राठोड याला सुभाष चव्हाण, सुरज उत्तम चव्हाण, मनोज उत्तम चव्हाण , उत्तम सरदार चव्हाण सर्व रा. सुभाषवाडी यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या गटातील सुभाष उत्तम चव्हाण (वय-४५) रा. सुभाषवाडी ता.जि.जळगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुभाष चव्हाण यांची मुलगी ही घराच्या अंगणात भांडी घासत असतांना भांड्याला बैलगाडीचा धक्का लागला यावर मुलीने बैलगाडी दुरून घेता येत नाही असे सांगितल्याचा राग आल्याने पुंडलिक श्रावण राठोड यांच्यासह राजेश श्रावण राठोड, निलेश श्रावण राठोड, श्रावण मांगो राठोड, गोपीचंद भागचंद राठोड, बंटी गोपीचंद राठोड, जितू सौजी राठोड रा. सुभाषवाडी यांनी सुभाष चव्हाण यांना शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी सुभाष चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बळीराम सपकाळे करीत आहे. 

Protected Content