भाजप अल्पसंख्यांक सेल महानगराध्यक्षांसह पंधरा जणांचे राजीनामे (व्हिडिओ)

WhatsApp Image 2020 01 04 at 6.23.26 PM

जळगाव, प्रतिनिधी | भारतीय नागरिकत्व कायदा व एनआरसी या विषयाला अनुसरून भाजप सरकार हे अल्पसंख्यांक समाजावर अन्यायकरीत असल्यामुळे जळगाव शहर महानगर अध्यक्ष शेख इरफान नूरी यांच्या नेतृत्वात एकूण १५ सभासदांनी पद व सभासदत्वचा राजीनामा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुस्लिम मंचतर्फे आयोजित उपोषणस्थळी येऊन सादर केलेत.

आम्ही मुस्लिम मंचसोबत असून आमचा सीएए व एनआरसीला विरोध आहे. हा कायदा जबरदस्ती लावणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून आम्ही आपल्या भाजप सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी लेखी पत्र मंचाचे पदाधिकारी करीम सालार, मुकुंद सपकाळे, गफ्फार मलिक, सय्यद शाहिद व फारुक शेख यांच्याकडे सुपूर्द केले. महानगराध्यक्ष इरफान नूरी सोबत उपाध्यक्ष फिरोज चिष्टी, सिद्दिक मनियार कार्यालय मंत्री, सादिक रंगरेज युवा अध्यक्ष, गुड्डू शेख उपाध्यक्ष, नूर मोहम्मद उपाध्यक्ष, लुकमान लोखंडवाला उपाध्यक्ष, वसीम खाटीक सचिव, युसूफ खान सचिव, मुनव्वर शेख उपाध्यक्ष, इक्बाल कुरेशी उपाध्यक्ष, अकील मन्यार ,गुड्डू खान व शेख अब्दुल्ला शेख मसूद यांनी आपले राजीनामे सादर केले.

Protected Content