भुसावळ प्रतिनिधी । वरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये दर गुरुवारी गरोदर मातांची तपासणी होत असून, त्यात प्रामुख्याने शरीरात वाढणाऱ्या बाळाच्या हृदयाचे ठोक नियमित आहे की नाही, याबाबत विशेष लक्ष दिले जाते, पण मागील 3 महिन्यापासून फिटल डॉपलर मशीन बंद असल्याने तपासणी साध्या पद्धतीने होत आहे, ही बाब लक्षात आल्यावर वाढदिवसाचे औचित्य साधत फिटल डॉपलर भेट देण्यात येत आहे, असे प्रतिपादन ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानच्या सचिव डॉ. रेणुका निलेश पाटील यांनी आज केले.
या छोटेखानी उपक्रमात ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.नितु पाटील,वैद्यकीय अधिकारी.डॉ. सनी जैन,परिचारिका प्रीती आराक, शीतल बोद्दडे, प्रतिष्ठान सभासद कपिल राणे,दीपक फेगडे, राहुल कोचुरे आदी उपस्थित होते.
पुढे त्या म्हणाल्या की, ग्रामीण रुग्णालयात फिटल डॉपलरने बाळाचे ठोक्याचे आवाज आईला आणि डॉक्टरला ऐकता येतात शिवाय वजनाने पण हलके आहे आणि कंपनी ची एक वर्षाची गॅरंटी असून आरामात कुठेही हलवता येईल असे आहे.
ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारच्या समस्या असून त्यात मशिनरी आणि औषधे यांचा पण तुटवडा आहे.भुसावळ ग्रामीण रुग्णालयात ज्या प्रकारे लोकसहभागातून मदत कार्य सुरू झाले असून आता त्याठिकाणी “मदत जनचळवळ” झाली आहे,त्याचप्रमाणे वरणगाव आणि परिसरातील दानशूर नागरिकांनी पुढे येउन आपल्या ग्रामीण रुग्णांना चांगल्या सुव्यवस्था देण्याबाबत पुढाकार घ्यावा आणि या जनहितार्थ कार्यात आपला सहभाग वाढवावा,असे भावनिक आवाहन वासुदेव नेत्रालयाचे संचालक तथा उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक वैद्यकीय आघाडीचे डॉ. नितु पाटील यांनी केले आहे.
बाळाचे ठोक ऐकणे म्हणजे स्वर्गीय अनुभूती…!
आपल्या उदरात वाढ होणाऱ्या बाळाच्या हृदयाचे लयबद्ध ठोके ऐकणे, हे कोणत्याही मातेसाठी स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारी बाब आहे.हा आनंद त्यांना मनसोक्त लुटता यावा तसेच डॉक्टरांना पण तपासणी मध्ये सुलभता यावी , म्ह्णून माझ्या वाढदिवसानिमित्त(२३ जुलै) फिटल डॉपलर मशीन भेट दिली आहे.