भुसावळ, प्रतिनिधी | येथील बाजारपेठ पो.स्टे.मध्ये ५ मार्च २०१९ रोजी दिपाली उर्फ वंदना अमित शर्मा ( वय-३९ रा.दिनदयाल नगर भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्याद वरून राजकुमारी कलीम शेख विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, राजकुमारी शेख ही फरार झाली होती तीस आज बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी राजकुमारी कलीम शेख (वय-२५ रा.दिनदयाल नगर भुसावळ) ही भुसावळ शहरात दिनदयाल नगर भागात आल्याची पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाली. या गुप्त बातमी वरुन गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी व महिला होमगार्ड यांनी त्याठिकाणावरुन पाहीजे व फरार महिला आरोपी हीस ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.संदीप परदेशी, पो.हे. कॉ. जयराम खोडपे, पो.ना.रविंद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे, महिला पो.ना.गिता कश्यप व महिला होमगार्ड मीनाक्षी चौधरी, तृप्ती नारखेडे अशानी केली असून सदर गुन्हाचा तपास पो.हे.कॉ. जयराम खोडपे हे करीत आहेत.