जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात आदर्श हाय-टेक आयटीआय प्रथम

bhusavl

भुसावळ प्रतिनिधी । जिल्हास्तरीय शासकीय व अशासकीय आयटीआय तंत्रप्रदर्शन सोहळा जळगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यात भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील आदर्श हाय-टेक प्रा. आयटीआयच्या प्रशिक्षणार्थ्यांनी सादर केलेल्या ‘आदर्श हाय-टेक सोलर सायकल’ या उपकरणास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले आहे.

या जिल्हास्तरीय शासकीय व अशासकीय आयटीआय तंत्रप्रदर्शनाचे बक्षीस वितरण जैन इरीगेशनचे उपाध्‍यक्ष जे.एस.जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख एच.आर.व्‍यवस्‍थापक, चेसिस ब्रेक लि.जळगावचे बी.टी.चेमटे व जि.व्य.शि.व प्रशिक्षक अधिकारी जळगाव डि.आर.तायडे यांची उपस्थिती होती.

४० ते ४५ उपकरणे सादर
या प्रदर्शनात शासकीय व अशासकीय अशा संस्थानी एकूण ४० ते ४५ उपकरणे सादर केले होते. त्यात आदर्श हाय-टेक प्रा. आयटीआय कुऱ्हे (पानाचे) यांनी सादर केलेल्या ‘आदर्श हाय-टेक सोलर सायकल’ या उपकरणाचे तांत्रिक, औद्योगिक ज्ञान व प्रशिक्षणातील कौशल्याचा वापर करून कल्पकता पूर्वक सहभागी होऊन प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

‘आदर्श हाय-टेक सोलर सायकल’चे फायदे
या उपकरणाचे प्रमुख फायदे म्हणजे ही सायकल सौर उर्जा इलेक्ट्रीक व पँडलवर सुद्धा चालते. या उपकरणाला तयार करण्याचा उद्देश म्हणजे इंधनाची बचत करणे,पर्यावरणाची होणारी हानी थांबवणे,ध्वनी प्रदूषण व वायु प्रदूषण मुक्त करणे व सामान्य वर्गाला परवडणारी, विद्यार्थ्यांना व महिलांना उपयुक्त असणे हा होता.

यांचा होता सहभाग
आदर्श हाय-टेक सोलर सायकल तयार करण्यासाठी संस्थेचे विजतंत्री व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी योगेश वानखेडे, ललित माळी, राज अनुसे, गजानन कोळी, प्रशांत पाटील व विशाल पाटील यांचा सहभाग होता. त्‍यांना संस्थेचे अध्यक्ष कैलास महाजन, शिवाजीराव पाटील, आर.बी.महाजन, प्राचार्य कुरेशी व गटनिदेशक, निदेशक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे सर्वस्तरावरुन कौतुक होत आहे.

Protected Content