यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील आमोदा शेत शिवारातील शेत विहिरीत ५६ वर्षीय व्यक्तीने उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी २८ मार्च रोजी सायंकाळी घडली. जांचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोट आढळून आली आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक वामन भंगाळे (लक्ष्मीनारायण नगर, भुसावळ, मूळ रहिवासी आमोदा, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, अशोक वामन भंगाळे हे भुसावळातील रेशनदुकानावर सेल्समन म्हणून काम करत होते. सोमवारी २८ मार्च रोजी ते दुचाकी घेऊन आमोदा येथे जाण्याकरीता भुसावळातून निघाले. सायंकाळ झाली मात्र ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या मोबाईलवर केला. परंतू कॉल एका वेगळ्याच इसमाने उचलला आणी दुचकीच्या डक्कीत मोबाईल सोडून व्यक्ती गेली कुठे असे शोधतांना विहिरीत अशोक भंगाळे यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच फैजपूर पोलीस ठाण्याचे सपोनि सिद्धेश्वर आखेगावकर, पोलीस उपनिरीक्षक मोहन लोखंडे, सहायक फौजदार हेमंत सांगळे, अरूण नमायते, महेश वंजारी हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांना मृतदेहा जवळ सुसाईड नोट मिळाली होती. त्यात म्हटले आहे की, “भुसावळ येथील संशयित आरोपी मुन्ना सोनवणे पूर्ण नाव माहीत नाही हा रेशन दुकानात येवुन एक वर्षाचे रेशन धान्य फुकट द्यावे, म्हणून वारंवार त्रास देवून जीवे ठार मारण्याची धमकी देत होता”. असे नमूद होते. या धमकीला घाबरुन व आरोपी मुन्ना सोनवणे यांच्या त्रासाला कंटाळून अशोक भंगाळे यांनी आमोदा शिवारातील शेत शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात संशयित आरोपी मुन्ना सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक अयाज शेख करीत आहे.