जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील फत्तेपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू विरोधी शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. जामनेरचे नवनिर्वाचित उपसभापती एकनाथ लोखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून फत्तेपुर येथील नवनिर्वाचित सरपंच बेबी पाटील हे होते.
राज्यात जनजागृती होण्याचे आवाहन
ग्लोबल ऍडल्ट टोबॅको सर्वेक्षणानुसार २०१६-१७ च्या सर्वेक्षणानुसार राज्यात कमी वयात तंबाखु व तंबाखु जन्य पदार्थांच्या सेवनामध्ये वाढ होत असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे असंसर्ग रोग नियंत्रण कार्यक्रम व तंबाखु नियंत्रण कार्यक्रम व भारत सरकार चा तंबाखु नियंत्रण कायदा २००३ प्रभावी पणे राबविला जावा समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ‘तंबाखु विरोधी शपथ’ घेण्यात आली.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
मुन्ना बंब, सुधाकर पाटील, संजय चौधरी, देवानंद लोखंडे, ज्योती चौधरी रमेश भोळे आदी मान्यवर उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी उपस्थितांना तंबाखु विरोधी शपथ दिली. डॉ. विवेक जाधव यांनी सूत्रसंचलन केले तर भागवत वानखेडे यांनी आभार प्रदर्शन केले. प्रसंगी टी.आर.पाटील, आवळाबाई चौधरी, अर्चना गवई, सुनील पाटील, युवराज वाघ, अनंता अवचार, अमोल वाघ, मनीषा शेळके, रेखा तायडे, सुनीता पाटील, प्रकाश महाले, कविता वाहुळे, लीना चौधरी, मनीषा वाकोडे, एम.डी. राठोड, ज्योती महोरिया, शांताराम खोतकर, पुजा चौधरी आदी उपस्थित होते.