भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी भागातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी धुळे येथे दोन लाखांची मागणी करत शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासू व सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील माहेर असलेल्या फरहाना कौसर शेख शाहरूख वय २७ यांचा विवाहिता धुळे येथील शेख शाहरूख शेख हारून यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला माहेरहुन २ लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही, या रागातून पती शेख शाहरूख याने शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच सासु व सासरे यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला, हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघुन आल्या. त्यानंतर त्यांनी गुरूवार ३ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास महिला पोलीस नाईक अर्चना अहीरे हे करीत आहे.