Home Cities यावल चंद्रशेखर सोनवणे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान

चंद्रशेखर सोनवणे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील डांभुर्णी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चंद्रशेखर सोनवणे यांना शासनाच्या वतीने दिला जाणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ग्रामसेवक चंद्रशेखर सोनवणे यांना हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे अनेकांनी अभिनंदन व स्वागत करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. चंद्रशेखर हे पिंपळे बुद्रुक या ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असुन चोपडा येथे वास्त्यवास आहेत. सेवानिवृत्त आदर्श शिक्षक निंबाजी काका सोनवणे यांचे ते चिरंजीव तसेच आपल्या गावाचे भूषण सहायक पोलीस आयुक्त दिनेश सोनवणे (मुंबई पोलीस) यांचे ते बंधू चंद्रशेखर सोनवणे यांना संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) तसेच सोनवणे परिवार व डांभुर्णी ग्रामस्थ स्वयंदीप प्रतिष्ठान जळगाव जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांनी स्वागत करीत अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound