राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ट्रकचालक जागीच ठार

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावरील असलेल्या भुसावळ तालुक्यातील बोहर्डी फाट्याजवळ मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता एक भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक ट्रक पलटी झाला, ज्यात ट्रकचालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

 

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक नागपूरहून लोखंडी पाईप घेऊन गुजरातकडे जात होता. मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता बोहर्डी फाट्याजवळ पोहोचताच चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात ट्रकचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे मुक्ताईनगर-भुसावळ दरम्यान महामार्गावरील एकेरी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. याबाबत भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content