जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने दुचाकीस्वाराला उडविले. ही घटना महामार्गावरील साईराज रेस्ट्रॉरंटसमोर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दीपक गोकुळ सोनवणे व त्यांचा मुलगा लोकेश दीपक सोनवणे (वय ५, रा. बीबा नगर) हे बाप लेक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
शहरातील बीबा नगरात दीपक सोनवणे हे वास्तव्यास असून ते (एमएच १९ डीयू १४४७) क्रमांकाच्या दुचाकीने मुलगा लोकशला घेवून द्वारका नगरात जाण्यासाठी निघाले. महामार्ग ओलांडत असतांना पाळधीकडून जळगावकडे जाणाऱ्या (एमएच ३१ एफसी ४७४५) क्रमांकाच्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दीपक सोनवणे त्यांच्या मुलगा लोकेश हे दोघ गंभीर जखमी झाले. दरम्यान, महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनी जखमी बापलेकाला तात्काळ वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.