कृषिकन्यांनी प्रयोग शून्य ऊर्जेवर आधारित शीतकक्ष उभारला

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषी माल नाशवंत असल्यामुळे त्याची त्वरित विक्री न झाल्यास खराब होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते.

शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेवून जळगांव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अंतिम वर्षाचे विद्यार्थीनी कोथळी येथे कृषी कन्या प्रेरणा बाविस्कर, दिप्ती चऱ्हाटे, समृद्धी कडू, कल्याणी महाले, तेजस्विनी निकम, खुशबु पाटील, दीक्षा सोनवणे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषी मालाची साठवण करता यावी आणि भाववाढ झाल्यानंतर विकता यावा; यासाठी शून्य उर्जेवर आधारित शीतकक्ष उभारले आहे.

यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.ए डि मत्ते व संबंधित विषयातील विषय विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Protected Content