मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वडोदा शिवारातील शेतकऱ्याच्या शेतात हिंस्त्र प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात १४ बकऱ्या मृत्यूमुखी पडल्या होत्या. शासनाकडून पिडीत शेतकऱ्याला नुकसान भारपाई देण्यात आली असून नुकताच धनादेश देण्यात आला आहे.
याबाबत सुत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, वडोदा येथील शेतकरी शालिग्राम बोदडे यांचे शेतात 14 फेब्रुवारी रात्री 11 वाजताचे सुमारास तार कंपाऊंड मधे बंधिस्त असलेल्या 14 बोकड यांचे वन्य श्र्वापदाने घात केला होता. यावेळी आमदारांनी या रात्रीच नवनीत पाटिल यांचे कडे जबाबदारी देत रात्री 11 वाजता वन विभागास आदेश देत पंचनामा करायला लावला होता व नवनीत पाटिल यांनी स्वतः लक्ष देत रात्रीच्या वेळेस पंचनामा करून घेतला होता. या नंतर आमदार यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शेतकऱ्यास शब्द दिला तुम्हाला योग्य ती शासकीय मदत मिळवून देण्यास मी पूर्ण पणे प्रयत्न करतो. या नंतर आमदारांनी दिलेला शब्द पूर्ण करत शेतकरी शालिग्राम बोदडे यांना शासकीय मदत म्हणून 89,250/- रुपयाचा चेक आज शिवसेना उपतालुका प्रमुख नवनीत पाटिल व सहकारी यांचे हातून वितरीत करण्यात आला.
यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख नवनीत पाटिल, गट प्रमुख विनोद पाटिल, सतीश नागरे, गण प्रमुख नारायण पाटिल, सो सेल विभागप्रमुख दिपक वाघसर, विश्वास पाटील, इम्रान हाजी, प्रमोद वाघमारे, रशीद सेठ, अण्णा पवार, भगवान केदार, गजानन लाहासे, अशोक राजगुरु, शेख निसार, गजानन इंगळे, राजू जाधव आदी उपस्थित होते.