अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कोणतीही पूर्वसूचना न देता आपत्कालीनच्या नावाने वीज बंद करण्याच्या घटना घडत असल्याने संतप्त तापी परिसरातील मठगव्हाण,नालखेडा,रुंधाटी, मुंगसे,गंगापुरी, पातोंडा येथील शेतकर्यांनी पातोंडा येथील महावितरणच्या उपकेंद्रात धडक देऊन घेराव घालून संबंधित अधिकार्यांना जाब विचारला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या महिनाभरापासून पावसाने पाठ फिरवल्याने पावसाचा अजूनही पत्ता नसल्याने शेतकरी निराश झाले आहेत. पाण्याअभावी पिके जळू लागली आहेत.मशागतीसाठी शेतकर्यांनी लाखो रुपये खर्च करून टाकलेत.जून महिन्यात लागवड करण्यात आलेली बागायती कापसाची पिके आता कमरेइतके वाढलेली आहेत.काही दिवसांनी कापूस वेचणीला लागतील अशी पिकांची स्थिती आहे.पण पावसाचे पाणी महिनाभरापासून न पडल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यात अजिराईत पिकांची स्थिती कोरडमडलेली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.त्यात जिराईत पिकांची स्थितीही चिंताजनक जाणवू लागली आहे.त्यांना पाणी देणे अत्यावश्यक असून शेतकर्यांना रात्र पाळीपासून पिकांना पाणी भरण्यासाठी महावितरणच्या वेळापत्रका नुसार जावे लागत आहेत.शेतात गेल्यावर शेतीपंपाची मोटर सुरू केल्यावर काही वेळातच वीज बंद केली जात आहे.
दरम्यान, रात्री-अपरात्री महावितरणच्या कर्मचार्यांना शेतकर्यांकडून विचारणा केली असता वरिष्ठ पातळीवरून लोडशेडिंगसाठी आपत्कालीन मेसेज येत असून त्यानुसार शेतीपंपाची वीज बंद केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी, पाणी भरण्यासाठी मोटर सुरू केल्यावर एक दीड तास होत नाही तोवर वीज बंद होते त्यामुळे शेतकर्यांना रात्री बेरात्री शेतातून घरी व घरातून शेतात जावे लागत आहे त्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले आहेत.
खरं तर, शासन शेतकर्यांना दिवसा वीज पुरवू शकत नाहीत किमान रात्री तरी किमान आठ तास वीज पुरवठा सुरळीत का ठेवू शकत नाही ? असा प्रश्न आता विचारला जात आहे. पिकांना आता जर पाणी दिले नाहीत तर उभी पिके जळून खाक होतील व शेतकर्यांना तोंड ठोकल्याशिवाय पर्याय उरणार नाही.आधीच शेतकर्यांनी शेतीसाठी कर्जे उचलून मोठे आर्थिक संकट उचलले आहे.त्यातच जर पिके वाया गेली तर शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.महावितरणचे कर्मचारी शेतकर्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता शेतीपंपाची लोडशेडिंग सुरू करून दिली आहे.
या सर्व प्रकारांमुळे संतप्त शेतकर्यांनी पातोंडा महावितरणचे उपकेंद्र गाठत कार्यालयाला घेराव घातला.पण तिथल्या कर्मचार्यांनी आम्ही फक्त वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करीत असतो त्यामुळे शेतकर्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना याबाबत विचारणा केली असता विजेचे उत्पादन कमी व मागणी जास्त असल्या कारणाने सर्वत्र लोडशेडिंग केली जात असल्याचे तेच ते उत्तर शेतकर्यांना मिळाले.त्यात शेतकरी यांनी जर यावर तुम्ही तात्काळ तोडगा नाही काढला तर आमचे पिके तुमच्या लोडशेडिंगच्या पाण्याअभावी मरतील असे शेतकर्यांनी सुनावले.याबाबतचे निवेदन शेतकर्यांनी प्रभारी कनिष्ठ अभियंता सुरेश धनगर, कर्मचारी सुरेश नेरकर यांना देण्यात आले.निवेदनावर शेतकर्यांच्या सह्या होत्या.
वीजेच्या लपंडावाबाबत शेतकरी केदार पवार म्हणाले की, पावसाने पाठ फिरवली आहेत.त्यामुळे पाण्याअभावी आमची पिके जळू लागली आहेत.आम्ही रात्री बेरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जातो तेवढ्यात बत्ती गुल होते.रात्री खाली हात घरी माघारी जावे लागते.परिणामी पिकांना पाणी देता येत नाहीत.त्यामुळे आमची पिके हातातून जाण्याची शक्यता आहे.महावितरणने लोडशेडिंगच्या नावाखाली फक्त शेतकर्यांवर जो अन्याय सुरू केला आहे तो तात्काळ बंद केला नाही तर आम्ही महावितरणचे कार्यालय बंद पाडू असा इशारा देखील शेतकरी केदार पवार यांनी दिला आहे.