यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतातील विहिरीजवळ काम करत असतांना तोल जावून पडल्याने शेतकऱ्याचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील गिरडगाव शिवारात घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिलीप उत्तम पाटील वय ५२ रा. गिरडगाव ता.यावल असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, दिलीप पाटील हे आपल्या कुटुंबियांसह गिरडगावात वास्तव्याला होते. सोमवारी २६ मे रोजी दुपारी ते गिरडगाव शिवारातील शेतातील विहिरीजवळ काम करत असतांना त्यांचा अचानक तोल गेला. त्यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. शेत परिसरात काम करणाऱ्यांनी तातडीने त्यांनी बाहेर काढून यावल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या घटनेमुळे गिरडगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दिन शेख हे करीत आहे.