Home क्राईम विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

विषबाधा झाल्याने शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; नातेवाईकांचा आक्रोश

0
214

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धामणगाव शिवारातील शेतात फवारणी करतांना विषबाधा झाल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना प्रौढ शेतकऱ्याचा उपचारादरम्यान गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. किशोर अभिमन तायडे वय ५२ रा. धामणगाव ता.जळगाव असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धामणगावात किशोर तायडे हे आपल्या पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला होतो. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी दुपारी ते शेतात पिकांवर फवारणी करत असतांना त्यांना विषबाधा झाली. या विषबाधामुळे त्यांची प्रकृती खालावली त्यामुळे त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उचार सुरू असतांना गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात आक्रोश केला होता. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात आई मिराबाई, पत्नी बेबाबाई, ललित आणि जयवंत ही दोन मुले, भाऊ राजू असा परिवार आहे.


Protected Content

Play sound