Home Cities चोपडा ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकर्‍याचा मृत्यू ( व्हिडीओ )

ट्रॅक्टर अंगावरून गेल्याने शेतकर्‍याचा मृत्यू ( व्हिडीओ )

0
45
kingaon farmer death

kingaon farmer death धानोरा, ता. चोपडा प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या किनगाव येथे अंगावरून ट्रॅक्टर गेल्यामुळे शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

किनगाव येथिल रहिवासी असलेले प्रमोद देवराम तायडे (वय ४५) हे आज दुपारी इचखेडा शिवारात आपल्या मालकीचे ट्रॅक्टर नं एमएच १९ – ४७१९ ने ट्रॅक्टरने शेत रोटर करीत असताना ट्रॅक्टर बांधावरून फिरवित असताना ट्रॅक्टर पलटी झाले. यात प्रमोद तायडे ट्रॅक्टरखाली दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. घटना गावात समजताच गावातील ग्रामस्थांनी लागलीच घटना स्थळी धाव घेत प्रमोदचा मृतदेह बाहेर काढला.

प्रमोद तायडे ची घरची परिस्थिती हालाखीची असुन त्याला दोन भाऊ असुन एक कांदा ची देवाण घेवाणची कामे करतात. तर लहान भाऊ ट्रॅक्टर चालवित असे. कांदा व्यापार आटोपल्याने तो लहान भावाला ट्रॅक्टरवर न पाठविता आज तो स्वतः आपले ट्रॅक्टर घेवुन शेत रोटर करण्यासाठी गेला होता. मयत प्रमोद तायडे हा त्याचा एक भाऊ उमेश तायडे याला कांद्याच्या धंद्यात मदत करायचा. प्रमोद तायडे हा मनमिळाऊ स्वभावाचा होता.त्यांच्या पश्‍चात आई; पत्नी; दोन मुले; एक मुलगी व दोन भाऊ आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पहा : या दुर्घटनेचा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound