निमगाव येथे शेतमजूर तरुणाची आत्महत्या

7c7e9964 654d 4114 8d70 63c37c9c0216

यावल( प्रतिनिधी) तालुक्यातील निमगाव येथे आज सकाळी राहत्या घरात शेतमजुरी करणाऱ्या तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

 

या संदर्भात पोलीस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की, निमगाव तालुका यावल येथे राहणारा शरद भागवत तायडे (वय ९ वर्ष) या शेतमजुरी करणाऱ्या विवाहीत तरूणाने आज दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. पत्नी शौचास गेली असता आपल्या घराच्या छताला मोटरसायकलच्या क्लॉजच्या वायरीने गळफास घेतला. घरात असलेल्या शरद तायडे यांच्या लहान मुलीने बाबा लटकले, बाबा लटकले असा जोरजोरात आरडाओरड केल्याने वाडयातील मंडळीने घराकडे धाव घेतली. नागरिकांनी छताला लटकलेल्या शरद तायडे यांना तात्काळ खाली उतरवले. यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता,वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मयत घोषित केले. शवविच्छेदन वैद्यकिय अधिकारी डॉ. मंगेश मेंढे यांनी केले. दरम्यान, मयत तायडे यांना दोन मुले, एक मुलगी, पत्नी असे कुटुंब आहे. आत्महत्पा का केली? याचे कारण मात्र समजु शकले नाही. या संदर्भात मयताचा चुलत भाऊ विनोद नामदेव कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख हे करीत आहे.

Protected Content