चोपडा (प्रतिनीधी)तालुक्यातील चौगाव येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्या आधी गावात फेरी काढून मुलांना शाळेत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच पर्यावरणरत्न विश्राम तेले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
शाळेच्या प्रथम दिवसाचे औचित्य साधून पर्यावरण, वृक्ष संवर्धन, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्क्रुष्ट कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय निसर्गदुत ‘ग्रीन मँन अॅवार्ड २०१९’ मिळाल्या बद्दल येथील पर्यावरणरत्न विश्राम तेले यांचा मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष रितेश धनगर, शिक्षक प्रल्हाद ठाकरे, दिपक बारेला, नानेश्वर पाटील, सुधाकर पाटील, संजिव शेटे, विलास पाटील, विद्यानंद साठे, श्रीमती कपिला पाटील, प्रितम सोनवणे व ग्रामस्थ उपस्थीत होते.