गजकेसरी स्टील कंपनीच्या कौटुंबिक मेळाव्यात अधिकाऱ्यांनी दिली माहिती
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । जालना येथील “गजकेसरी स्टील” कंपनीची सळई जळगावात लक्ष्मण ट्रेडर्सच्या माध्यमातून गेल्या ७ वर्षांपासून जळगावकरांच्या पसंतीला उतरली आहे. कमी वेळात सर्वात जास्त लोकांच्या पसंतीला उतरलेली एकमेव स्टील कंपनी म्हणजे गजकेसरी स्टील कंपनी. जालना जिल्ह्यातील सर्वात उत्कृष्ट आणि दर्जेदार स्टील कंपनी ज्यांची जळगावात बुधवारी १२ जून रोजी ‘गजकेसरी स्टील’ तर्फे कौटुंबिक मेळावा घेण्यात आला. यामध्ये कंपनीच्या सर्व जुन्या-नव्या उत्पादनांची माहिती जिल्ह्यातील नामांकित अभियंता, कंत्राटदार, विकासकांना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जळगाव जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते लक्ष्मण ट्रेडर्सतर्फे शहरात अभियंते, विकासक, बिल्डर्स, कंत्राटदार यांचा कौटुंबिक मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थितांना जालना येथील ‘गजकेसरी स्टील’ चे अधिकारी गोपाल नरेश जिंदल यांनी कंपनी व उत्पादनांविषयी माहिती दिली. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील ‘गजकेसरी स्टील’ च्या उत्पादनांचा उगम, विकास आणि त्याबाबत सविस्तर माहिती लक्ष्मण ट्रेडर्सचे विक्रेते रवींद्र शर्मा यांनी दिली. जिल्हाभरात ग्राहकांच्या विश्वासावर विक्रेत्यांचे जाळे निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
जालना येथिल कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर हेमंत साठे यांनी कंपनीच्या उत्पादनांची माहिती देऊन त्याचा उपयोग व मजबूती याविषयी पीपीटीद्वारे सविस्तर सांगितले. पर्यावरणपूरक उत्पादन म्हणून ‘ग्रीन प्रो’ आणि NABL अधिकृत अद्यावत प्रयोगशाळा हे प्रमाणपत्र देऊन कंपनीला गौरविण्यात आलेले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्ह्याभरातुन ३०० च्या वर अभियंते, विकासक, बिल्डर्स, कंत्राटदार आपल्या कुटुंबा तर्फे उपस्थित होते.