जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील ख्वाजा नगर भागात पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले. या घटनेत एकावर आणि त्यांच्या कुटुंबावर लाकडी लाफा व दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, पहूर पोलिसांनी चार संशयितांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
घटनेचा सविस्तर तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, शेख हमीद शेख ईमाम (वय ४८) यांचा मुलगा सोईल आणि आरोपी यांच्यात पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता. २१ २०२६ रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास, शेख हमीद हे आपल्या घरासमोर उभे असताना संशयित आरोपी शाकीर शेख सलीम यांनी पैशांच्या विषयावरून पुन्हा चर्चा झाली. यावेळी वादाचे रूपांतर शिवीगाळीत झाले.

रागाच्या भरात आरोपी शाकीर शेख सलीम याने शेख हमीद यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने घरासमोर पडलेला बांधकामाचा लाकडी लाफा उचलून त्यांच्या डोक्यात जोरात मारल्याने ते जखमी झाले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांची पत्नी हसिनाबी, मुले आणि पुतण्या धावून आले असता, हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला चढवला. नाशीर शेख सलीम याने सोईलला लाकडी लाफ्याने मारहाण केली, तर शाकीरने साहिलला धक्का देऊन डाव्या हातावर प्रहार केला. वसीम शेख याने हसिनाबी यांच्यावर दगडफेक केली, तर ईम्रान शेख याने फिर्यादीचा पुतण्या अजहर याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
याप्रकरणी शाकीर शेख सलीम, नाशिर शेख सलीम, इमरान शेख सलीम, वसीम हसन शेख सर्व रा. ख्वाजा नगर, पहूर पेठ, जामनेर यांच्याविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत दाते हे करीत आहे



