रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील आठ ग्रामसेवकांना अपंग प्रमाणपत्र सादर करण्यासाठी दहा दिवसाचा अल्टीमेटम गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी दिला आहे. या गंभीर प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोईच्या ठिकाणी बदली मिळावी म्हणुन रावेर तालुक्यातील आठ ग्रामसेवकांचा प्रताप तालुकाभरात गाजतोय यामध्ये ग्राम सेवक अरविंद कोलते, अनिल वराडे, रवींद्रकुमार चौधरी, नितीन महाजन, शामकुमार पाटील, छाया नेमाडे व राहुल लोखंडे , व विजय पाटील या आठ ग्रामसेवकांनी अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याच्या प्रकार उघडकीस आला आहे.
त्यामुळे या ग्रामसेवकांना शो कॉज नोटीस देण्यात आली आहे दिलेले अपंगत्वाचे मेडिकल बोर्डाचे मूळ प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश बीडीओ कोतवाल यांनी या ग्रामसेवकांना दिले आहेत. यासाठी १० दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. अन्यथा या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.