Home Uncategorized मसाका कर्मचार्‍यांचे आंदोलन चिघळले : रास्ता रोको आंदोलन

मसाका कर्मचार्‍यांचे आंदोलन चिघळले : रास्ता रोको आंदोलन

0
29

फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | थकीत वेतन मिळण्यासह कारखाना विक्री प्रकरणातील संशयकल्लोळ दुर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू केले असून आज हे आंदोलन चिघळले आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जापोटी बँक सिक्युरटायझेशन नियमाच्या अंतर्गत मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री केली असून खासगी मालकाने याचा गाळप हंगाम सुरू केला आहे. नवीन मालकांनी कर्मचार्‍यांची थकीत देणी देण्यास नकार केल्याने कर्मचार्‍यांनी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, आज सकाळी जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर हे आंदोलनस्थळी भेट देणार असल्याची माहिती समोर आली होती. या आधीच कर्मचार्‍यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मसाकाच्या कर्मचार्‍यांनी आज सकाळी अंकलेश्‍वर-बर्‍हाणपूर महामार्ग रोखून धरत आपला रोष व्यक्त केला. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. तर रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूंनी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

या आंदोलनात खासदार रक्षाताई खडसे, अमोल हरीभाऊ जावळे, शरद महाजन आदींसह परिसरातील लोकप्रतिनिधींनी देखील भाग घेतला आहे.


Protected Content

Play sound