फैजपूर, ता. यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील भूमापन कार्यालय दोन ऐवजी तीन दिवस सुरू रहावे अशी माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांनी केलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांची सुविधा होणार आहे.
याबाबत वृत्त असे की, फैजपूर शहर व परिसराच्या आजूबाजूची गावे हे फैजपूर नगर भूमापन कार्यालयाशी संलग्न आहेत. फैजपूर येथील कार्यालय हे आठवड्यातून फक्त दोन दिवस बुधवार व गुरूवार असे उघडले जाते त्यामुळे सर्व नागरीकांची फार मोठ्या प्रमाणात गैरसोयहोत होती. जर एखाद्या बुधवार गुरूवार या दिवशी शासकीय सुट्टी किवा कार्यालयातील साहेबगैरहजर राहीले किंवा सदर दिवशी शासकीय मिटींग असल्यास सदरचे कार्यालय हे १५ ते२० दिवस उघडत नाही. म्हणून माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी उपअधिक्षक भूमी अभिलेख यावल यांना लेखी निवेदन देऊन गावकर्यांची समस्या त्यांचेसमोर मांडली होती.
दरम्यान, या मागणीची दखल घेण्यात आली असून उपअधिक्षक भूमी अभिलेख यावल यांनी फैजपूर नगर भूमापन कार्यालय हेआठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, बुधवार, गुरूवार कार्यरत राहील तसेच परिरक्षण भूमापक फैजपूर हे रजेवर असल्यास किंवा इतर शासकीय कामानिमित्त बाहेर असल्यासत्यांचे जागी इतर कर्मचारी फैजपूर कार्यालयात पाठवून जनतेची कामा गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे असे लेखी पत्रात म्हटले आहे. यामुळे आता फैजपूर परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.