फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील जे. टी. महाजन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये पायथॉन प्रोग्रामींग कार्यशाळेस प्रारंभ करण्यात आला आहे.
फैजपुर येथील जे टी महाजन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मध्ये दिनांक १६ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर यादरम्यान सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांसाठी पायथॉन प्रोग्रम्मिंग लैंग्वेज सर्टिफिकेशन कोर्स २०२१ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे.या कार्यशाळेसाठी पॅशन सॉफ्टवेअर सोल्युशनचे मनोज कुमावत यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या कार्यशाळेचा लाभ ११५ विद्यार्थी घेत आहेत.
प्रोग्रॅमींग ही आधुनिक युगासाठी अत्यावश्यक घटक असून विद्यार्थ्यांच्या इंडस्ट्रियल ग्रोथ साठी ही कार्यशाळा अतिशय आवश्यक आहे. यामध्ये पायथॉन प्रोग्रामिंग विषयी अगदी बेसिक ज्ञानापासून डव्हान्स स्टेप पर्यंत मार्गदर्शन करण्यात येत आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना नोकरी मिळवण्यासाठी खूप फायदा होणार आहे तसेच विद्यार्थी या ज्ञाना द्वारा स्वतःच्या व्यवसाय मध्ये सुद्धा खूप प्रगती करू शकतात. या अनुषंगाने संबंधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यशाळेच्या यशस्विततेसाठी प्र प्राचार्य डॉ. एन. डी. नारखेडे, डीन अकॅडमिक डॉ. पी. एम. महाजन,कम्प्युटर विभागाचे प्रमुख डॉ के. एस. भगत, प्रा ए. बी. नेहेते, प्रा. पी. एस. देशमुख, प्रा. मोहिनी चौधरी व संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.