फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी | येथील जे. टी. महाजन इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे अभियांत्रीकी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणार्या मोफत ऑनलाईन सीईटी सराव परिक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.
फैजपूर येथील जे टी महाजन इंजिनिअरिंग कॉलेज मार्फत बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंजिनिअरिंग प्रवेशासाठी लागणाऱ्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा सराव व्हावा म्हणून पहिल्या मोफत ऑनलाइन सीईटी परीक्षेचे आयोजन दि 28 ऑगस्ट, शनिवार या दिवशी 11 वाजता करण्यात आलेले होते. सदर परीक्षा 568 विद्यार्थ्यांनी दिली.अशा प्रकारच्या आणखी चार परीक्षा दि 31 ऑगस्ट, 3 सप्टेंबर,7 सप्टेंबर व 10 सप्टेंबर या तारखांना देता येतील.ज्यांनी नोंदणी केलेली नाही असे विद्यार्थी अजूनही नाव नोंदणी करू शकतात. या सराव परिक्षेचा विद्यार्थ्यांना गुण वाढी सोबतच मानसिक तणाव निश्चितच दूर होईल असे मनोगत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. विद्यार्थी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकतात https://www.testkatta.com/stdregeng.php?s=641
विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर मोफत सराव परीक्षेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थाध्यक्ष शरद महाजन,संचालक मंडळ, प्रभारी प्राचार्य डॉ एन डी नारखेडे सर्व विभाग प्रमुख, डीन अकॅडमिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी डॉ जी ई चौधरी 9423974207,डॉ के जी पाटील 9637081291व प्रा पी. पी. ठोंबरे यांचेशी संपर्क साधावा.