फैजपूर प्रतिनिधी । गेल्या चार दिवसापासून शहरातील काही परिसरातील अवैध धंदे अचानक बंद झाल्यावर सुद्धा काही ठिकाणी सट्टा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने न्हावी येथे धाड घालून एकास अटक केली तर स्थानिक पोलिसांनी शहरातील धाड घालत दोघांना ताब्यात घेतले.
शहरातील झोपडपट्टी भागात सट्टा घेताना लक्ष्मण बाबुराव चंदनशिव व राजीव या दोघांना ताब्यात घेतले तर न्हावी येथे रोहिदास कोंडू तायडे यांच्यावर कारवाई करण्यात आली या तिघांकडून सट्टा जुगाराचे साहित्य व अनुक्रमे २७० रुपये व ५४० रुपये असे एकुण ८१० रुपये हस्तगत करण्यात आले या तिघांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे राजेंद्र पाटील, अनिल इंगळे, रमेश चौधरी, भारत पाटील फौजदार रोहिदास ठोंबरे राजेश बराटे, देविदास सूरदास, उमेश चौधरी, अमजद पठाण यांनी केली या अवैध धंद्यांवर सातत्याने कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे