फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । अयोध्येतील श्रीप्रभु रामचंद्रांच्या जन्मस्थळी भव्यदिव्य राममंदिराला प्रत्येकाचा निधी रुपी हातभार लागावा यासाठी प्रत्येक घरा घरातून निधी उभारण्यासाठी येथील श्रीराम मंदिरात भुसावळ विभागाचे निधी संकलन प्रमुख महामंडलेश्वर सतपंथ रत्न महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली.
बैठकीत राम भक्तांसमोर सदर विषयाची सविस्तर मांडणी महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी केली. स्वेच्छा समर्पण निधी संकलित करण्याचे कार्य शहरातील प्रत्येक घरा घरात पोहचविण्यासाठी रामभक्तांनी परिश्रमांची पराकाष्टा करण्याचे या मंदिर उभारणीच्या निधी योगदानात शहरातील प्रत्येक कुटुंबाने यथाशक्ती जास्तीत जास्त सढळ हाताने करावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, संबंधीत अभियान मकरसंक्रांती अर्थात, १४ जानेवारी २०२१ ते १५ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. याची अंबिका वस्ती,महाराणा प्रताप वस्ती,श्रीराम वस्ती, हनुमान वस्ती अशा चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. तर शहरात विस्तृत नियोजन बैठक येत्या काळात घेऊन शहर कार्यालय उघण्यात येणार आहे,प्रास्ताविक दीपक पाटील तर सुत्रसंचालन हर्षल महाजन,व दीपक कपडे यांनी केले.
या बैठकीस माजी नगराध्यक्ष बी. के. चौधरी, पी. के. चौधरी, निलेश राणे, अभियान प्रमुख लोकेश कोल्हे,भरत महाजन,विनोद कोल्हे ,वैभव वकारे, नीरज झोपे, नरेंद्र नारखेडे,भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, पत्रकार संजय सराफ,निलेश पाटील,माजी नगरसेवक संजय रल,पप्पू चौधरी,रघुनाथ कुंभार,मोहित पाठक,वसंत परदेशी, किरण चौधरी,पिंटूभाऊ तेली,बापू वैद्य,राहुल भोई यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.