फैजपूर प्रतिनिधी । बांधकामासाठी लागणारे सव्वा लाख रूपये किंमतीच्या सेट्रींगच्या लोखंडी प्लेटा चोरून नेल्याप्रकरणी फैजपूर पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोन संशयितांना फैजपूर पोलीसांनी अटक केली असून एक फरार आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील ताहनगर येथील रहिवाशी फिर्यादी अझरखान अयुबखान, (वय- 40) हे बांधकाम करण्याचे काम करतात. त्यांच्या सेंटींगच्या लोखंडी प्लेटी 235 नग किंमत 1 लाख 17 हजार 500 रूपये किंमतीच्या सेट्रींगच्या लोखंडी प्लेटा 3 सप्टेंबर 2019 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले होता. याप्रकरणी फैजपूर पोलीसात अझरखान अयुबखान यांच्या फिर्यादीवरून भाग 5 गु.र.नं 70/2019 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी संशयित आरोपी शेख अश्पाक उर्फ भुऱ्या शेख सलिम (वय-28) रा. ईस्लामपूरा फैजपुर आणि शेख मुद्सर उर्फ मुद्या शेख गफ्फार (वय- 29) रा. पठाणवाडी फैजपुर यांना फैजपूर पोलीसांनी अटक करत त्यांच्या ताब्यातील 1 लाख 17 हजार 500 रु किंमतीच्या सेट्रींगच्या लोखंडी प्लेटी बऱ्हाणपूर येथून हस्तगत करण्यात आले. या गुन्ह्यातील तिसरा आरोपी शहा रमजान शहा फकिर, रा. ईस्लामपुरा फैजपुर हा फरार आहे. गोपनिय माहितीनुसार उप विभागीय पोलिस अधिकारी नरेंद्र पिंगळे व सपोनि प्रकाश वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ विजय पाचपोळ, पोहेकॉ इकबाल सैय्यद, पोकॉ उमेश चौधरी अशांनी ही कारवाई केली.