विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा

death penalty hanging

जळगाव प्रतिनिधी । सावत्र मुलांसह सुना व पतीकडून वारंवार छळ अमानुषपणे मारहाणीला कंटाळून महिलेने गुरूवारी गळफास घेवून आत्महत्या केली होती. याप्रकरणी आज शनिवारी पतीसह सावत्र मुलांसह सुनांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील द्वारका नगरातील मुकूंदा शिंपी यांच्यासोबत सुरेखा उर्फ सरोज मुकूंदा शिंपी (वय 56, रा. द्वारकानगर) यांचे सन 2005 साली गंधर्व लग्न झाले होते. मुकूंदा शिंपी यांना पहिल्या पत्नीपासून भुषण व राहूल असे दोन मुले व एक मुलगी असून मुलगी मुंबई येथे नांदत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पतीसह दोन्ही सावत्र मुलांकडून सुरेखा यांना मारहाण करुन त्यांना मानिसिक त्रास देत होत्या. याबाबत त्यांनी अनेकदा त्यांचा भाऊ व बहिणीकडे आपबिती कथन केली होती. मात्र त्यांच्याकडून वारंवार सुरेखा शिंपी यांची समजूत काढून त्यांना पुन्हा घरी पाठवित होते. दुकान वाढविण्यासाठी माहेरुन आठ लाख रुपये आण यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून पतीसह मुले व सुनांकडून त्यांना शिवीगाळ करीत मारहाण करुन अधिक प्रमाणात त्रास दिला जात असल्याचे त्यांनी सुसाईट नोटमध्ये नमुद केले आहे.

पिशवी हरविल्यावरुन मारहाण
सुरेखा शिंपी यांना सावत्र पतीसह सावत्र मुले व सुनांकडून वारंवार मारहाण केली जात होती. दरम्यान ता. गुरुवार 18 रोजी घरात पिशवी हरविल्याच्या कारणावरुन पती मुकूंदा शिंपी यांच्यासह सावत्र मुलगा भुषण व त्याची पत्नी मोहिनी, राहूल व त्याची पत्नी कशिश यांनी डोळ्यात मिरची पावडर फेकून बोटाला चावित काठीने बेदम मारहाण केली असल्याचे सुरेखा यांनी त्यांची बहिण चित्रा यांना फोनवरुन माहिती दिली होती.

कंटाळून मृत्यूला कवटाळले
शुल्लक कारणांवरुन सुरेखा यांना पती मुकूंद सपकाळे यांच्यासह दोन्ही सावत्र मुले व सुनांकडून नेहमीच अमानुषपणे मारहाण केली जात होती. ता. 18 रोजी सुरेखा यांना मोहिनी यांची आई उषाबाई सोनवणे यांनी देखील बेदम मारहाण केली होती. वारंवार होणाऱ्या मानिसिक व शारिरीक त्रासाला कंटाळून सुरेखा शिंपी यांनी आत्महत्या करीत मृत्यूला कवटाळले.

 

आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
आत्महत्येच्या दिवशी दुपारी 1 वाजेनंतर सुरेखा यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. ही संपूर्ण हकिकत सुरेखा शिंपी यांनी मृत्यूपूर्वी सुसाईट नोटमध्ये लिहीली होती. याप्रकरणी सुरेखा शिंपी यांचे भाऊ सुरेश जगदाळे यांच्या फिर्यादीवरुन पती मुकूंदा शिंपी, सावत्र मुलगा भुषण, राहूल, सुना मोहिनी, कशिश व मोहिनीची आई उषाबाई सोनवणे सर्व रा. जळगाव या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content