Home Cities यावल फैजपूर येथे पश्‍चिम बंगाल मधील हिंसाचाराचा निषेध

फैजपूर येथे पश्‍चिम बंगाल मधील हिंसाचाराचा निषेध

0
46

फैजपूर ता यावल प्रतिनिधी । पश्‍चीम बंगालमधील निकालानंतर सुरू झालेल्या हिंसाचाराचा येथील भारतीय जनता पक्षातर्फे निवेदनाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला.

पश्‍चिम बंगाल मध्ये विधानसभा निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भा.ज.पा. कार्यकर्त्यांची हत्या, त्यांच्या दुकानांची, घरांची लूट करीत – जाळपोळ, तोडफोड ,करत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा येथील भाजप कार्यकारिणीने निषेध केला आहे.

या बाबी फैजपूर भा.ज.पा. शहराध्यक्ष अनंता नेहेते यांच्या मुख्यपत्रावर जाहीर निषेधार्थ निवेदन फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांना फैजपूर भाजपच्या वतीने शहराध्यक्ष अनंता नेहेते,माजी नगराध्यक्ष निलेश राणे, पदाधिकारी आनिल वासुदेव तेली,वैभव वकारे,संजय भावसार आदींनी दिले असून पश्‍चिम बंगाल मध्ये तत्काळ राष्ट्रपती लावण्याची मागणी केली आहे.


Protected Content

Play sound